बातम्या
आहारात गवती चहाचा समावेश करा आणि अनेक रोगांना दूर ठेवा !
By nisha patil - 7/11/2024 7:29:37 AM
Share This News:
गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत.आहारात गवती चहाचा समावेश करा आणि अनेक रोगांना दूर ठेवा !
गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. तसचे अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात. आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
पाचन तंत्र- गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. गवती चहाचा उपयोग ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता, अतिसार आणि सूज येणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी केला जातो. ते पाच प्रणाली मजबूत बनवते.
आहारात गवती चहाचा समावेश करा आणि अनेक रोगांना दूर ठेवा !
|