बातम्या
मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा !
By nisha patil - 3/4/2024 7:08:52 AM
Share This News:
सध्याच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण आदी गोष्टींमुळे लोकांना आरोग्य आणि आहाराकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्यामुळे साहजिकच लोकांचा कल फास्ट फूड, जंक फूडकडे असतो.
मात्र या पदार्थांमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन गंभीर आजाराचा धोका वाढतो. मेंदू हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण मेंदूवर अवलंबून असतं. त्यामुळे मेंदूचं आरोग्य उत्तम राहणं गरजेचं असतं.
मेंदूचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश गरजेचा असतो. बदाम, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्यांमुळे मेंदूची कार्यप्रणाली निरोगी राहते, असं तज्ञ सांगतात. उत्तम आरोग्यासाठी परिपूर्ण आणि पोषक आहार गरजेचा असतो. आहार सर्वसमावेशक असेल तर गंभीर आजाराची जोखीम कमी होते.
मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश गरजेचा असतो. शरीराचं संपूर्ण नियंत्रण मेंदूकडे असतं. त्यामुळे मेंदुची कार्यप्रणाली व्यवस्थित राहण्यासाठी पोषक आहार आवश्यक असतो. बहुतांश लोक रोजच्या आहारात टोमॅटोचा वापर करतात. टोमॅटोची भाजी, सूप आदी पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत. मेंदूच्या आरोग्यासाठी टोमॅटोचं सेवन उपयुक्त ठरते. टोमॅटोमध्ये लायकोपिन मुबलक असतं. त्यामुळे टोमॅटो मेंदुसाठी फायदेशीर मानले जातात. तुम्ही टोमॅटोची कोशिंबीर, भाजी किंवा सूप आदी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करू शकता.
आरोग्यासाठी आपण ड्रायफ्रुट्स आवर्जून खातो. ड्रायफ्रुट्समध्ये हेल्दी फॅट आणि प्रोटिन मुबलक असतं. रोज बदाम आणि अक्रोड खाल्ल्यानं मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं. आक्रोड व बदाम रात्री भिजत ठेऊन सकाळी खाणे उत्तम. तसेच बदामाची साल काढून टाकणे.
या ड्रायफ्रूट्समध्ये ओमेगा-3 अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात. हे दोन्ही घटक मेंदूच्या आरोग्यासाठी पूरक मानले जातात.
चहा आणि कॉफी प्यायल्यास तुम्हाला ऊर्जावान वाटतं. तसंच चहा आणि कॉफी पिणं मेंदूसाठी लाभदायी असतं. एका संशोधनानुसार, चहा आणि कॉफीतील कॅफिनमुळे तुमच्या मेंदूतील माहिती प्रक्रिया क्षमता सुधारते. मात्र चहा-कॉफी मर्यादित घेणं गरजेचं आहे. शिवाय चहा दुधविरहीत व गुळाचा असल्यास उत्तमच. अतिप्रमाणात कॉफी किंवा चहापान केल्यास आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.
लहानपणापासून आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये केळी आणि पालकाची भाजी विशेष गुणकारी मानली जाते. या भाज्यांमध्ये फॉलिकअॅसिड, व्हिटॅमिन के, ल्युटिन आणि बीटा कॅरोटिन मुबलक प्रमाणात असते. या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास आपली स्मरणशक्ती सुधारते तसेच मेंदूचे आरोग्य देखील उत्तम राहते.
मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा !
|