बातम्या

डोळ्यात मोतीबिंदू होऊ नये म्हणून आहारात या 4 गोष्टींचा करा समावेश

Include these 4 things in your diet to prevent cataracts


By nisha patil - 11/17/2023 8:13:14 AM
Share This News:



डोळ्यांचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे. याकडे कधीही दुर्लक्ष करु नये. कारण डोळ्यांना काही झाले तर व्यक्तीला दैनदिन जीवनात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सध्या मोतीबिंदूची समस्या ही अनेकांमध्ये दिसून येत आहे.

वाढत्या वयाबरोबर मोतीबिंदू आपोआप वाढतो. मधुमेहामुळे देखील डोळ्यात मोतीबिंदू होऊ शकतो. मोतीबिंदू झाल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागते. पण आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

या पदार्थांमुळे मोतीबिंदूचा धोका होतो कमी

1. धान्याचे सेवन करा

मोतीबिंदू वेळीच रोखता येऊ शकते. मोतीबिंदू टाळयचा असेल तर तुम्हाला संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा लागेल. तुम्ही तुमच्या आहारात ब्राऊन राइस आणि गहू यांचा समावेश करू शकता.

2. गाजर खा

गाजर हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रोज गाजराचे सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या टाळता येतात.

3. फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश

फळे आणि भाज्यांमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. रताळे, भोपळा आणि आंबा यांचा आहारात समावेश केल्यास मोतीबिंदूचा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे रोज फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.

4. आंबट फळे

मोतीबिंदूची समस्या टाळण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे सेवन करा. ज्यामुळे तुमचे डोळेही निरोगी राहतात. संत्री, लिंबू इत्यादींचे सेवन करु शकता.

अस्वीकरण: ही बातमी फक्त सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे. हा वैद्यकीय सल्ला असू शकत नाही. कोणतीही समस्या असली की तज्ज्ञांचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.


डोळ्यात मोतीबिंदू होऊ नये म्हणून आहारात या 4 गोष्टींचा करा समावेश