बातम्या
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यातील गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश
By nisha patil - 6/22/2023 10:34:39 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या आराखड्यात हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यातील एकूण २६ गावांचा समावेश करावा, असा आदेश सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने काढला आहे. या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी नामदार गुलाबराव पाटील मंत्री,पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांना पत्र दिले होते. त्यानुसार आदेश काढले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी व शिरोळ तालुक्यातील गावांत सध्या असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेस बरीच वर्षे पूर्ण झाली आहे. जुन्या योजनेला प्रचंड गळती होऊन योजना कमकुवत झाल्याने गावांत पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. गावची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आणि जुनी योजना कमकुवत झाल्याने नवीन योजना करुन पाण्याचे स्त्रोत वाढविणे आवश्यक आहे. अशी मागणी खासदार श्री. माने यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन केली होती.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यातील गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश
|