बातम्या
आपल्या लाईफस्टाइलमध्ये समाविष्ठ करा 4 चांगल्या सवयी
By nisha patil - 11/25/2023 7:16:31 AM
Share This News:
शरीराला ताकद हाडांमधून येते. मजबूत हाडे असल्याने चांगली मुद्रा राहते. म्हणूनच त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर हाडेही कमकुवत होतात. त्यामुळे सांधेदुखी आणि हाडदुखी ची समस्या सुरू होते. तसेच वारंवार फ्रॅक्चर आणि हाडे तुटण्याचा धोकाही वाढतो. ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकते. काही चांगल्या सवयींमुळे या समस्यांपासून सुटका मिळू शकते. या सवयींबद्दल जाणून घेऊया.
अधिक कॅल्शियम मिळवा
शरीरात कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. दूध, सोयाबीन, पनीर आणि हंगामी फळे कॅल्शियम पुरवतात.नियमित तपासणी
विशिष्ट वयानंतर हाडांचे रक्षण करणे खूप गरजेचे असते. यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची पातळी कोणत्याही स्थितीत कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी बोन डेन्सिटी टेस्ट करणे खूप महत्वाचे आहे.
या गोष्टी टाळा
तज्ज्ञांच्या मते, मद्यपान आणि धूम्रपानामुळे हाडे कमजोर होतात. हाडे मजबूत बनवायची असतील तर दारू, धुम्रपान ही व्यसन सोडा.
योग्य व्यायाम करा
योग्य व्यायाम हाडे मजबूत करण्याचे काम करतो.
चुकीचा व्यायाम केल्यास हाडांना इजा होते. यासाठी एरोबिक्स, चालणे,
वेट लिफ्टिंग यांसारखे नियमित व्यायाम करा.
आपल्या लाईफस्टाइलमध्ये समाविष्ठ करा 4 चांगल्या सवयी
|