बातम्या
22 जानेवारीला ‘सिझेरियन’ प्रसुतीची मागणीत वाढ
By nisha patil - 1/19/2024 5:08:12 PM
Share This News:
अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. या दरम्यान, देशभरातील गर्भवती महिला या दिवसाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. कारण, याच दिवशी अनेक महिलांना सिझेरियन पद्धतीने प्रसुती करवून घेण्याची इच्छा असून त्या संदर्भातील मागणी वाढताना दिसत आहे. यात उत्तर प्रदेशमधील महिलांचा प्रामुख्याने समावेस आहे.
उत्तर प्रदेशमधील गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील स्त्रीरोग तज्ज्ञ सीमा द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 तारखेला एका लेबर रूममध्ये सुमारे 12 ते 14 महिलांनी सिझेरियन पद्धतीने प्रसुतीसाठी मागणी केली आहे.
त्या महिलांच्या मागणीनुसार, त्यांच्या प्रसुतीची खरी तारीख 22 जानेवारी पूर्वीची किंवा नंतरची असली तरीही याच शुभ दिनी आपलं मूल जन्माला यायला हवं आहे. या दिवशी आपल्या मुलाने जन्म घ्यावा जेणेकरून आपलं मूल प्रभू श्रीरामांसारखं होईल, अशा आशेपोटी त्यांनी ही मागणी केल्याची माहिती मिळत आहे
.22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विधी संपन्न होणार आहेत. त्यानंतर हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होईल. या सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू असून राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विविध राज्यांतील अनेक लोक अयोध्येला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही लाखांच्या संख्येत भाविक अयोध्येत जमणार असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भाविकांनी याच दिवशी अयोध्येला येणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
22 जानेवारीला ‘सिझेरियन’ प्रसुतीची मागणीत वाढ
|