बातम्या

बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ

Increase in health complaints due to changing environment


By nisha patil - 12/10/2023 7:16:54 AM
Share This News:



 

मुंबई आणि कोकण वगळता संपूर्ण राज्यात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 15 अंश सेल्सिअसच्या आसपास फरक असतो.त्यामुळे नागरिकांना सकाळी गारवा तर दुपारी कडक उन्हाचे चटके सोसावे लागतात. याचाच परिणाम नागरिकांच्या प्रकृतीवर होत आहे.


गेल्या काही दिवसात अंगदुखीचा अनुभव येत असून आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.६ ऑक्टोबरपासून मान्सून ओसरू लागला.त्यानंतर आता शहर आणि उपनगरात ऑक्टोबर हीटचा परिणाम जाणवू लागला आहे.

तापमानात अचानक वाढ झाल्याने मुंबई ऑक्टोबर हीटच्या सावटाखाली आहेपुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पारा 32 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.पुढील काही दिवस मुंबई शहर आणि उपनगरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज आहे.त्यानंतर तापमानात काहीशी घट होईल.12 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ