बातम्या

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि विवेकवाद रुजवा: कृष्णात स्वाती यांचे आवाहन

Inculcate scientific approach


By nisha patil - 4/9/2023 5:34:07 PM
Share This News:



विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि विवेकवाद रुजवा: कृष्णात स्वाती यांचे आवाहन
       

शहाजी महाविद्यालयात नाट्यप्रयोगातून प्रबोधन.

कोल्हापूर: विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, त्याच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि विवेकवाद रुजवा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी केले.दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विवेक वाहिनी च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
     

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर अंतर्गत विवेक वाहिनी उद्घाटनानिमित्त सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम हे रिंगण नाटक त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी सादर केले. या नाटकातून त्यांनी सॉक्रेटिस दाभोलकर पानसरे आणि तुकाराम यांचे विचार सादर केले.
 

 कृष्णात स्वाती म्हणाले ,  समाजातील धर्मांध आणि कर्मकांड करणाऱ्या लोकांनी सॉक्रेटीस, दाभोळकर, पानसरे, तुकाराम यांचा खून करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्ती नव्हत्या तर ते विचार होते. त्यांचे विचार आजही समाजाला प्रगतीपथावर नेताना दिसतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आत्मसात करावेत आणि आपले आत्मोन्नती साधावी असे आवाहनही त्यांनी केले. 
 

प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले  दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्यावर धाडसाने पुस्तक लिहिले. विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावा आणि अंधश्रद्धेला मूठ माती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ.शिवाजीराव जाधव यांनी केले. आभार डॉ. आर.डी.मांडणीकर यांनी मानले. 
   

महाविद्यालयाचे प्रबंधक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाट्य प्रयोग सादर केलेला सर्व कलाकारांचा यावे सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनीही नाट्यप्रयोगातील विविध कलाकारांनी संवाद साधला. संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले


विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि विवेकवाद रुजवा: कृष्णात स्वाती यांचे आवाहन