बातम्या

चक्क रशियात मोदींच्या भाषणात 'आवारा' चित्रपटातील गीत

Indeed the song from the movie Awara in Modis speech in Russia


By nisha patil - 9/7/2024 6:33:56 PM
Share This News:



देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया  दौऱ्यावर असून सोमवारी संध्याकाळी ते मॉस्को शहरात पोहोचले. यावेळी मॉस्कोत हजारो भारतीय नागरिक मोदींच्या स्वागताला जमले होते, रशिया युक्रेन युद्धानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान जेंव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले तेंव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या स्वागतासाठी तिथे आधीच उभे होते. पीएम मोदी कारमधून उतरताच त्यांनी प्रथम हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली आणि दोघांमधील मैत्रिपूर्ण संबंध या भेटीतून जगाला दाखवून दिले. मोदींनी आज मॉस्को शहरात भारतीयांशी संवाद साधला. भारतीयांना उद्देशून बोलताना राज कपूर  यांच्या आवारा चित्रपटातील गाण्याच्या लाईनच मोदींनी बोलून दाखवल्या. त्यावेळी, उपस्थित भारतीयांनी फिर भी दिल है हिंदुस्थानी.. अशी दाद मोदींना दिली.
 

 पंतप्रधान मोदींनी भारतीयांना संबोधित करताना भारत आणि रशिया यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. यावेळी भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर बोलताना मोदींनी आवारा चित्रपटातील राज कपूर यांच्या गाण्याच्या लाईनही बोलून दाखवल्या. या गाण्याचे शब्द ऐकून भारतीयांनीही फिर भी दिल है हिंदुस्थानी... असे म्हणत मोदींना दाद दिली.


चक्क रशियात मोदींच्या भाषणात 'आवारा' चित्रपटातील गीत