बातम्या
सोमवारपासून जिल्ह्यातील रेशन दुकानांचा बेमुदत बंद
By nisha patil - 12/30/2023 1:56:20 PM
Share This News:
सोमवारपासून जिल्ह्यातील रेशन दुकानांचा बेमुदत बंद
कोल्हापूर : सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने बेमुदत बंद राहणार आहेत. प्रलंबित मागण्यासाठी रेशन धान्य दुकानदारांनी एल्गार पुकारला आहे. या देशव्यापी आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील 1670 दुकाने बंद ठेवण्याचा निर्धार केल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य सचिव कॉ. चंद्रकांत यादव व जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रेशन व्यवस्था टिकावी ते सक्षम व्हावी, यासाठी दुकानदारांचा लढा सुरू आहे.मात्र रेशन दुकानदारांच्या मागण्यांना सरकार प्रतिसाद देत नाही त्यावर चर्चा करत नाही त्यामुळे संप करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली आहे. या आंदोलनात देशभरातील पाच लाख तर ते ५३ हजार राज्यातील दुकाने बंद राहणार आहेत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 16 जानेवारी रोजी संसद भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
२ जी वरून ४ जी मशीन बदलून द्यावे, रेशनचे कालबाह्य नियम बदला, मार्जिन मनी 300 करा, मासिक इन्कम गॅरंटी पन्नास हजार करा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा पात्रता निकष बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी ठेवा, त्यात काम दिल ऐवजी सोयाबीन सूर्यफूल तेल द्या, आंतरराष्ट्रीय पोर्टेबिलिटी धान्य वितरणाचे त्वरित मार्जिन मिळावे, जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून द्या, आधी मागणे आहेत यासाठी हा संपा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, दिनकर पाटील ,महादेव कदम, लिंगाप्पा पाटील, पांडू सुभेदार ,दीपक शिराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोमवारपासून जिल्ह्यातील रेशन दुकानांचा बेमुदत बंद
|