बातम्या

शेतकरी प्रश्नावरुन माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आक्रमक

Independent Bharat Party President Anil Ghanwat Aggarwal informed about farmers question


By nisha patil - 1/18/2024 4:45:01 PM
Share This News:



 शेतकरी प्रश्नावरुन माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आक्रमक

शेती प्रश्नासंदर्भात शासनाने तातडीने उपाय योजना न केल्यास गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट  यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन अहमदनगर जिल्हाधिकऱ्यांना दिल्याची माहिती घनवटांनी दिली. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतू सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवल्या नसल्याचे घनवट म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घनवट बोलत होते. 
 

महाराष्ट्रातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतू, सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे अनिल घनवट म्हणाले. 
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी उठवावी आणि शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सक्तीची कर्जवसुली बंद करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विमा या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे अनिल घनवट म्हणाले

 

दरम्यान, पुढच्या एका महिन्यात राज्य शासनाने वरील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी काही उपाययोजना केल्या नाहीत तर गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी भर सभेत जाब विचारतील असा इशारा निवेदनाद्वारे शासनाला दिला. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, लालासाहेब सुद्रिक, इंदुबाई ओहोळ यांच्यासहआदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते


शेतकरी प्रश्नावरुन माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आक्रमक