बातम्या

बिंदू चौकात शेतकरी आंदोलन बेदखल करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं

India Aghadi protests against Modi government evicting farmers protest in Bindu Chowk


By nisha patil - 2/26/2024 5:38:29 PM
Share This News:



बिंदू चौकात शेतकरी आंदोलन बेदखल करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं
 

कोल्हापूर - स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन सुरुय. या आंदोलना दरम्यान एका तरुण शेतकऱ्याचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झालाय. मात्र, केंद्र सरकार हे पोलीस प्रशासनाचा वापर करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंंय. या निषेधार्थ आज कोल्हापुरातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीनं बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आलीत. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला.

या आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण,शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष आर के पोवार, कोम्रेड दिलीप पोवार, माजी उपमहापौर विक्रम जरग, प्रा.उदय नारकर, उदय पोवार, भाई बाबुराव कदम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, आर पी आय, आम आदमी पार्टी, शेकाप, भाकप, माकप सह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


बिंदू चौकात शेतकरी आंदोलन बेदखल करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं