खेळ
भारत पाकिस्तान पुन्हा एकदा येणार आमने-सामने
By nisha patil - 2/28/2025 5:31:30 PM
Share This News:
भारत पाकिस्तान पुन्हा एकदा येणार आमने-सामने
सामन्यांची जय्यत तयारी सुरू...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा क्रिकेट सामना रंगतो तेव्हा तेव्हा दोन्ही देशांचे चाहते खूप उत्साहीत होतात. अलीकडेच इंडिया पाकिस्तान चॅम्पियनशिप ट्रॉफी मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते. ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. तर हे संघ आता पुन्हा प्रतिस्पर्धी म्हणून आमने-सामने येतील. आशियाई कप 2025 मध्ये हे दोन्ही संघ तीनदा एकमेकांसमोर भिडताना दिसणार आहेत.
आशियाई क्रिकेट परिषदेने सप्टेंबर मध्ये होणारे आशियाई कपचे अंदाजे वेळापत्रक अंतिम केल आहे. यावर्षी ही स्पर्धा टी20 स्वरूपात खेळवली जाईल. ज्यामध्ये एकूण 19 सामन्या असणार आहेत तर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या ते चौथ्या आठवड्या दरम्यान खेळवले जातील. अशाप्रकारे 2025 मध्ये आपल्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामने पहायला मिळू शकतात.
भारत पाकिस्तान पुन्हा एकदा येणार आमने-सामने
|