बातम्या
अमृतकाळात शिक्षकांनी सीमेवरील सैनिकाप्रमाणे कष्ट केल्यास भारत महासत्ता होईल.
By nisha patil - 8/8/2024 5:50:32 PM
Share This News:
अमृतकाळात शिक्षकांनी सीमेवरील सैनिकाप्रमाणे कष्ट केल्यास भारत महासत्ता होईल. मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
आगामी 25 वर्षाच्या अमृतकाळात शिक्षकांनी सीमेवरील सैनिकाप्रमाणे कष्ट केल्यास भारत महासत्ता होईल. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने विवेकानंद विद्यापीठाची स्थापना करुन बदलत्या शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय भूमिका घ्यावी . भारतीय ज्ञानपरंपरा आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम यामुळे आपला भारत विकसनशीलतेकडून विकसीत भारताकडे जाण्यासाठी उच्च् शिक्षण संस्थांची भूमिका महत्व्पूर्ण राहणार आहे. भारताला मानव संसाधनाचे महत्वाचे ठिकाण बनवायचे असेल तर आपले उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण, वैविध्यपूर्ण घडविण्याची गरज आहे. देशातील पालकांना गुणवतापूर्ण शिक्षण हवे आहे. आपल्याकडे गुणवत्ता शिक्षण नसल्याने मोठया प्रमाणात परदेशी जाणारा विद्यार्थी ही समस्या आहे. जगातील सर्वात मोठी युवाशक्ती भारताकडे आहे. म्हणून आपल्या देशात पायाभुत सुविधा आणि मानव संसाधने समृध्द करण्यासाठी कटिबध्द् कार्यक्रम राबविले जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र राज्य् देशात एक नंबरवर आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ब्रँण्ड् ॲम्बॅसिडर बनविण्यासाठी उच्च् शिक्षण विभाग कंबर कसत आहे. असे मत उच्च शिक्षण संचालक, डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मांडले.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 37 व्या स्मृतिदिन निमित्त्ा आयोजित विकसित भारत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी संघर्षातून बहुजन समाजाला शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी केली. शिक्षणातील संधी आणि आव्हाने ओळखून बापूजींनी 69 वर्षे शिक्षण क्षेत्रात अव्याहत कार्य केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना शिक्षकांनी सजग असणे गरजेचे आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यावर स्वार होण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले पाहिजे आणि समाजाभिमुख शिक्षणावर भर दिला पाहिजे. या बापूजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी बापूजींच्या विचार व कार्याचा वारसा आत्म्ासात करुन विद्यार्थी घडवावेत व संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन केले.
प्रारंभी संस्थेच्या कला शिक्षकांच्या कलाकृतीचे प्रदर्शन मान्य्वरांच्या हस्ते संपन्न् झाले. स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे म्हणाले, डॉ.बापूजी साळुंखे यांनी लावलेले ज्ञानाच्या रोपटयाचा ज्ञानवटवृक्ष झालेले आहे. शब्दांचे धन मानून गुरुदेव कार्यकर्ते ज्ञानार्जन करीत आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ता, संगणक, आधुनिक तंत्रज्ञान यांची सोबत करत संस्था दर्जात्मक विकास साधत आहे. याचा अभिमान वाटतो.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन देताना विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार म्हणाले, विवेकानंद कॉलेज अधिकारप्रदत्त् या ज्ञानमुद्रेसोबत सर्वोच्च् गुणवत्ता संपादन करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविते असते. आंतरराष्ट्रीय संबंधी आणि परराष्ट्र धोरण यांचे अभ्यासक, संशोधक, लेखक म्हणून शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी देशविदेशात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या प्रसंगी संस्थेतील गुणवंत विद्यार्थी बक्षिस वितरण व ग्रामस्थ श्री सुखदेव पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख मा. श्री. श्रीराम साळुंखे, संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
अमृतकाळात शिक्षकांनी सीमेवरील सैनिकाप्रमाणे कष्ट केल्यास भारत महासत्ता होईल. मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
|