विवेकानंद कॉलेजमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर, 26 जानेवारी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेजमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी ध्वजारोहण केले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण केले.
कार्यक्रमात एनसीसी विद्यार्थ्यांनी शानदार परेड आणि प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी सेवानिवृत्त होणारे, पीएच.डी. पदवी प्राप्त केलेले आणि अन्य गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.