बातम्या

इनर व्हील क्लबचे काम कौतुकास्पद - छत्रपती मालोजीराजे

Inner Wheel Clubs work appreciated Chhatrapati Malojiraje


By nisha patil - 3/23/2024 10:24:21 PM
Share This News:



इनर व्हील क्लबचे काम कौतुकास्पद - छत्रपती मालोजीराजे

शिक्षकांनी समाजहिताचे कामकाज करावे - क्रांती कुमार पाटील

इनर व्हील क्लबच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न

नागाळा. पार्क कोल्हापूर येथे  इनर  व्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् यांच्या वतीने आज मनपा प्राथमिक शाळा  व माध्यमिक शाळेतील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती मालोजीराजे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कमला काँलेजचे प्राचार्य क्रांतीकुमार पाटील होते.

इनर व्हील कल्ब च्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जे हाथ राबले त्यांना शोधून त्यांचा मानस्मान करण्यात आला.

महात्मा फुले, शाहु महाराज यांनी समाजातील जनतेसाठी राबले.त्याच धर्तीवर आजच्या शिक्षकांनी  ही शिक्षण द्यावे असे अध्यक्षस्थानी क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले. तसेच मिलिंद धोंड,मनिषा जाधव,स्मिता खामकर,मयुरा खोत,नंदीनी पाटील, वूशाली बाड,स्मिता मांडरे आदीसह क्लबचे पदाधिकारी, सभासद, मान्यवर उपस्थित होते.


इनर व्हील क्लबचे काम कौतुकास्पद - छत्रपती मालोजीराजे