विशेष बातम्या
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन...
By nisha patil - 10/3/2025 8:01:50 PM
Share This News:
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन...
300 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या वतीने तसेच प्रेसिडेंट स्मिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 9 मार्च रोजी सायबर चौक येथे आयोजित या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा मुख्य उद्देश सर्वाइकल कॅन्सर जनजागृती व महिलांचे आरोग्य राखणे हा होता.
या मॅरेथॉनमध्ये 2 किमी, 3 किमी, 4 किमी आणि 5 किमी असे चार गट तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये 300 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात धाव घेतली. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फुगे सोडून करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी झुंबा आणि योगाचे सादरीकरण करण्यात आले, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व स्पर्धकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आणि सर्वाइकल कॅन्सर जनजागृतीसाठी संदेश देणारे बॅनर हातात घेतले.
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन...
|