बातम्या

क्रिडा उपसंचालक सुहास पाटील यांची चौकशी करा

Inquire about Deputy Sports Director Suhas Patil


By nisha patil - 12/20/2023 5:57:40 PM
Share This News:



क्रिडा उपसंचालक सुहास पाटील यांची चौकशी करा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी
 

नागपूर - खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षित प्रमाणपत्र वाटपातील घोटाळ्यात नाव असलेल्या क्रिडा उपसंचालक सुहास पाटील यांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  केली.

खेळाडूंना २० दिवसांत प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियम असतानाही या अधिकाऱ्याने २०० दिवस उलटले तरीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. या गुन्ह्यासाठी क्रिडा खात्यातील आयुक्त त्यास मदत करतात, त्यामुळे अशा  अधिकाऱ्यावर राज्य सरकार कारवाई करणार का असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला..

खेळाडूला छत्रपती पुरस्कार घोषित असताना या पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचे पाप या अधिकाऱ्याने केले. क्रिडा मंत्र्यांना सुद्धा हे अधिकारी जुमानत नसल्याची खंत अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.


क्रिडा उपसंचालक सुहास पाटील यांची चौकशी करा