बातम्या
निद्रानाश : पुरेशी काळजी आणि व्यायामामुळे नियंत्रण शक्य
By nisha patil - 9/12/2023 7:18:07 AM
Share This News:
पुरेशी झोप न झाल्यास म्हातारपण लवकर येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, म्हातारपणात दिसणारे आजारही लवकर येतात. विशेषत: मधुमेह, रक्तदाब हे आजार वयाच्या ४० किंवा ५० या वर्षांत आढळून येतात. याला मानवी शरीरातील डीएनएच्या दोन्ही बाजूला असलेल्या टेलोमर घटक कारणीभूत आहे. वटवाघुळाचे वजन काही ग्रॅममध्ये असते. परंतु हा पक्षी साधारण ४० वर्षे जगतो. यामागील कारणांचा शोध घेतला असता, वटवाघुळामधील डीएनएच्या दोन्ही बाजूला असलेला टेलोमर हा घटक त्याच्या वाढत्या वयानुसार कमी होत नाही, उलट हा घटक कमी होऊ लागताच पुन्हा रिजनरेट होतो. यामुळे वटवाघूळ त्याच्या वजनाच्या तुलनेत खूप जास्त वर्षे जगतो. याच्या उलट मानवी शरीरात आहे. वाढत्या वयामुळे टेलोमर घटक कमी होतो. परंतु निद्रानाशाचा आजार असेल तर हा घटक लहान होण्याची गती वाढते.
निरोगी झोप ही सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मात्र, गुणवत्तापूर्ण झोपेअभावी अनेकांना निद्रानाश या आजाराला सामोरे जावे लागते. यामुळे आरोग्याबाबतच्या गंभीर समस्या निर्माण होतात. पुरेशी काळजी, नियमित व्यायाम व दिनचर्या आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास या आजाराचे दुष्परिणाम टाळता येणे शक्य आहे. दिवसा ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळू झोपू नये, झोपेच्या चार तास आधी धूम्रपान व मद्यपान करू नये, झोपेच्या सहा तास आधी चहा, कॉफी किंवा उत्तेजित पेय घेऊ नये, झोपण्याच्या चार तास आधी हलके जेवण घ्यावे, रोज व्यायाम करावा, झोपण्याअगोदर व्यायाम टाळावा, झोपायचा बिछाना आरामदायक असायला हवा, आवाज किंवा उजेडामुळे झोप भंग होणार नाही, हे पहावे, स्लीप ॲप्रिया हा झोपेशी संबंधित आजार आहे. त्याला निद्रानाश, असेही म्हणतात. उत्तम झोप येण्यासाठी त्याचा कालावधी, सातत्य आणि गुणवत्ता या तीन बाबी महत्त्वाच्या ठरतात. आजारात निरंतर श्वासोच्छवासाची प्रक्रिया बाधित होते. रक्तातील ऑक्सिजनच्या पुरेशा मात्रेअभावी हा आजार उद्भवतो. प्रौढात हा प्रकार प्रामुख्याने दिसून येतो. पुरेसा व्यायाम आणि पोषणतत्त्वाचा अभाव हेसुद्धा यामागील एक कारण आहे. यामुळे दिवसा झोप आणि थकवा आल्यासारखे वाटते. यामुळे स्मरणशक्ती कमी होणे व मधुमेह यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.
निद्रानाश : पुरेशी काळजी आणि व्यायामामुळे नियंत्रण शक्य
|