बातम्या

आयुक्तांकडून रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनची पाहणी

Inspection of Rabindranath Tagore Vidyaniketan by Commissioner


By nisha patil - 8/24/2023 10:00:38 PM
Share This News:



इचलकरंजी: प्रतिनिधी  इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज गुरुवारी महानगरपालिकेच्या रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन प्राथमिक शाळा क्रमांक २७ या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.तसेच शाळेमध्ये सुरू असलेल्या नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण 
 

कामकाजाचे कौतुक केले. या पाहणी दरम्यान आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शाळेच्या परिसराची स्वच्छता 
करून माझी वसुंधरा अभियानांतर्गत सभोवताली वृक्षारोपण करून उद्यान विकसित करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. तसेच सद्यस्थितीत असलेल्या शौचालयाची दुरुस्ती करून भविष्यात मुलांना आणि मुलींना स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या.

 

शासनाकडून प्राथमिक शिक्षण विभागासाठी १ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण काम होईल याची ग्वाही दिली.या भेटी दरम्यान आयुक्तांनी शालेय विद्यार्थ्यांंशी थेट संवाद साधला.त्यामुळे शाळेतील 
लहान मुला- मुलींना अत्यंत आनंद झाला.  यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांच्यासह शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.


आयुक्तांकडून रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनची पाहणी