बातम्या
जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील 44 मतदान केंद्रावरील evm ची तपासणी होणार
By Administrator - 11/30/2024 1:17:55 PM
Share This News:
जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील 44 मतदान केंद्रावरील evm ची तपासणी होणार
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या निकाल अपेक्षित असा लागलाय. महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत महायुतीने जिल्ह्यातील दहाही जागा जिंकल्या आहेत.
या निकालाबाबत शंका उपस्थित करत आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून 44 मतदान केंद्रावरील evm ची तपासनी व पडताळणी करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केलीय . यामध्ये चंदगड मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम च्या तपासणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार नंदाताई बाभुळकर, कोल्हापूर दक्षिण मधील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यावतीने १० मतदान केंद्रे, करवीर मधील 14 केंद्रांवरील ईव्हीएम बाबत काँग्रेसचे राहुल पाटील, कोल्हापूर उत्तर मध्ये १० मतदान केंद्रासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर, तर हातकणंगले मधील काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांच्या वतीने दहा केंद्रावरील ईव्हीएम च्या तपासणीची मागणी करण्यात आलीय. त्यानुसार जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ही तपासणी आणि पडताळणी होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी झालेले मतदान व ईव्हीएम वरील मतदान यामध्ये तफावत आढळून आल्याच्या तक्रारी आहेत.या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने ईव्हीएम तपासणी व पडताळणीच्या मागणीसाठी अर्ज करण्यास 29 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील एकूण 44 मतदान केंद्रावरील evm पडताळणीची मागणी महाविकास आघाडीच्या या उमेदवारानी केली आहे.
जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील 44 मतदान केंद्रावरील evm ची तपासणी होणार
|