बातम्या

भाजपाच्या वतीने कुंभार गल्ली परिसरात पूर परिस्थितीची पाहणी नागरीकांनी लवकरात लवकर स्थलांतरीत व्हावे : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

Inspection of flood situation in Kumbhar Galli area on behalf of BJP Citizens should migrate as soon as possible


By nisha patil - 7/26/2023 6:04:04 PM
Share This News:



कोल्हापूर दि.२६ भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. 
    पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूर शहरात शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर, कोंडाओळ, उत्तरेश्वर पेठ, बापट कॅम्प अशा विविध ठिकाणी पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरून प्रचंड नुकसान होत असते. यातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत त्याचबरोबर पावसाचा जोर कायम राहिल्यास याभागात पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे याभागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी या उद्देशाने आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी शाहूपुरी याठिकाणी जाऊन नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे त्याचबरोबर सतर्क राहण्याचे आवाहन केले, पाणी आपल्या दारापर्यंत येण्याची वाट न पाहता लवकरात लवकर स्थलांतर करून होणारी वित्त हानी टाळावी असेही सांगितले. त्याचबरोबर नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर परिस्थतीमध्ये मदतीसाठी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही याप्रसंगी नागरिकांना दिली. 
प्रदेश सचिव महेश जाधव यांनी कुंभार गल्लीतील नागरिकांना आपल्या गणेश मूर्ती, घरगुती, दुकानचे साहित्य स्थलांतरीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून टेंपो उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. 
     पंचमुखी गणेश मंदिर परिसर, शाहुपुरी २ री गल्ली या भागात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधून आश्वस्त केले. 
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, सचिन तोडकर, सुनीलसिंह चव्हाण, मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर, डॉ.राजवर्धन, विवेक कुलकर्णी, रवींद्र मुतगी, संदीप कुंभार, विजयसिंह खाडे पाटील, शैलेश पाटील, दीपक जाधव, आजम जमादार, आप्पा लाड, रशीद बारगीर, महेश यादव, विशाल शिराळकर, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, अनिल कामत, महादेव बिरांजे, दत्ता लोखंडे, अनिल पाटील, शाहरुख गडवाले, देवरथ लोंढे, योगेश साळोखे, हेमंत बापू पाटील, दिनेश पसारे, किरण तासगावे, सतीश पाटील, विश्वास जाधव, प्रवीणचंद्र शिंदे, सतीश आंबर्डेकर, मानसिंग पाटील ई. पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.


भाजपाच्या वतीने कुंभार गल्ली परिसरात पूर परिस्थितीची पाहणी नागरीकांनी लवकरात लवकर स्थलांतरीत व्हावे : जिल्हाध्यक्ष विजय जाधव