बातम्या

इंस्टंट जिलेबी रेसिपी

Instant Jalebi Recipe


By nisha patil - 1/26/2024 7:34:12 AM
Share This News:



इंस्टंट जिलेबी बनवण्यासाठी साहित्य

- मैदा - २ कप

- कॉर्नफ्लोअर - २ चमचे

- रवा - १ चमचा

- तूप - तळण्यासाठी

- फूड कलर - एक चिमूटभर

- व्हिनेगर - १ चमचा

- दही - अर्धी वाटी

- यीस्ट - अर्धा चमचा (छोटा)

- साखर - ३ वाट्या

- अर्धा लिंबू

- वेलची पावडर - १ चमचा

 

इंस्टंट जिलेबी बनवण्याची पद्धत

जिलेबी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात मैदा घ्या. आता त्यात कॉर्नफ्लोअर, दही, व्हिनेगर घालून मिक्स करा. आता अर्धा वाटी गरम पाणी घ्या आणि त्यात यीस्ट घाला. याला अॅक्टिव्ह होण्यासाठी पाच मिनिटे राहू द्या. आता ते मिश्रणात मिक्स करा. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. लक्षात ठेवा तुम्हाला ते खूप पातळ करण्याची गरज नाही. जिलेबी बनवायला सोपी जाईल एवढी पीठ पातळ ठेवा. आता वेलची पावडर आणि फूड कलर (ऐच्छिक) घाला. तुम्हाला फूड कलर नको असेल तर तुम्ही ते स्किप करु शकता.आता दुसऱ्या बाजूला एका भांड्यात तीन वाट्या साखर एक कप पाण्यात टाका. याचा पाक होईपर्यंत गॅसवर ठेवा. त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या म्हणजे ते गोठणार नाही. आता कढईत तूप गरम करा. दुधाच्या पिशव्या किंवा टोमॅटो केचपच्या बाटलीत पिठ भरून जिलेबी तयार करा. नंतर त्या पाकात टाका. तुमची क्रिस्पी जिलेबी तयार आहे.


इंस्टंट जिलेबी रेसिपी