बातम्या
बोर्डाच्या परीक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
By nisha patil - 4/2/2025 4:22:33 PM
Share This News:
दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बोर्डाच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार आढळल्यास संबंधित केंद्र संचालक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात.
यासाठी भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करा. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अधिक लक्ष ठेवा. परीक्षा केंद्रांवर मोबाइल वापरास बंदी घाला. प्रत्येक प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वेळेत देण्याच्या व उत्तरपत्रिका वेळेत घेतल्या जातील, याच्या सूचना शिक्षक व केंद्रप्रमुखांपर्यंत पोहोचवा असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील उपस्थित होते
बोर्डाच्या परीक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
|