बातम्या

अपुरी झोप हृदयासाठी धोकादायक, वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका

Insufficient sleep is dangerous for the heart


By nisha patil - 7/26/2023 7:36:18 AM
Share This News:



आपल्याला निरोगी, हेल्दी आयुष्य हवं असेल तर फक्त चांगला, पौष्टिक आहाराच नव्हे तर चांगली झोपही तितकीच गरजेची आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, प्रत्येकाने दररोज किमान 8 तास तरी झोप घेतलीच पाहिजे. झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर अस्वस्थ वाटतं. कोणतंही काम वेळेवर होत नाही आणि अंगात प्रचंड आळस भरून राहतो.विशेष म्हणजे आपण वेळेवर जेवलो नाही किंवा झोपलो नाही तर बॉडी सायकल किंवा शरीराचं जे चक्र असतं ते खराब होतं. ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. नीट, पुरेश झोप घेतली नाही तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर विपरीत परिणाम होतो. यामुळे सिंपेथिक नर्व्हस ॲक्टिव्हिटी वाढते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.

हार्ट ॲटॅकचा धोकाआपली झोप पुरी झाली नाही तर त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयावरील प्रेशर वाढतं आणि रक्तवाहिन्या खराब होण्याचा धोकाही असतो. असे दीर्घकाळासाठी सुरू राहिले तर हृदयविकाराचा किंवा हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉलवरही होतो परिणाम

अर्धवट झोपेमुळे केवळ हृदयाशी संबंधित आजार होण्याचाच धोका वाढत नाही तर त्यामुळे कोलेस्ट्रॉलवरही परिणाम दिसून येतो. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा गुड म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि खराब किंवा वाईट कोलेस्ट्रॉल वाढत राहतं. याचा परिणाम असा होतो की धमन्यांमध्ये प्लाक जमा होऊ शकतो, ज्यामुळे ब्लड फ्लोमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

मधुमेहाचाही असतो धोका

एवढंच नाही तर झोप पूर्ण न झाल्याने टाइप 2 डायबिटीस अर्थात मधुमेहाचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे ग्लूकोज मेटाबॉलिज्म प्रभावित होते, ज्याने ब्लड शुगर वाढू शकते. तसेच संबंधित व्यक्तीचे वजनही वाढण्याची शक्यता असते.

कशी घ्यावी काळजी ?

मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार किंव हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्या. टेक्नॉलॉजी गॅजेट्स, स्क्रीनपासून लांब राहा आणि झोपायचे वेळापत्रक बनवून ते नियमितपणे पाळा.


अपुरी झोप हृदयासाठी धोकादायक, वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका