बातम्या

कोल्हापुरातील बहुतांश भागात आज अपुरा पाणीपुरवठा

Insufficient water supply in most parts of Kolhapur today


By nisha patil - 8/26/2023 5:07:31 PM
Share This News:



कोल्हापुरातील आपटे नगर येथील ट्रान्सफॉर्म मध्ये बिघाड झाल्याने शनिवारी कोल्हापूर शहरातील ए बी व ई वॉर्डात आज अपुरा व कमी दामाने पाणीपुरवठा करण्यात आला  ट्रान्सफॉर्मर चे दुरुस्तीचे काम कालपासून सुरू असल्याने आज ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. शहरातील ए.बी वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ संभाजीनगर ,साळोखे नगर कात्ययनी  कॉम्प्लेक्स, रामानंदनगर विजयनगर, पाचगाव,वर्षा नगर ,आर के नगर तसेच इवॉर्ड अंतर्गत राजारामपुरी, शांतिनिकेतन परिसर, सम्राट नगर प्रतिभा नगर, यादव नगर ,जागृती नगर, कावळा नाका, रुईकर कॉलनी शिवाजी पार्क ,शाहूपुरी ,पाच बंगला इत्यादी भागात अपुरा पाणीपुरवठा करण्यात आला. नागरिकांनी उपलब्ध उपलब्ध पाणी काटकसऱ्याने वापरून सहकार्य करावे असा आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले


कोल्हापुरातील बहुतांश भागात आज अपुरा पाणीपुरवठा