बातम्या

अपमान केला चुकलो, पण ; संजय मंडलिक तोल सुटलेल्या वक्तव्यावर ठाम

Insult was wrong


By nisha patil - 12/4/2024 6:11:08 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूरात ऊनाचे चटके बसत असताना, राजकारणाचेही चटके सध्या बसू लागल्याने कोल्हापूरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.  आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी प्रचार सभेत केल्यानंतर कोल्हापूरसह राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. कोल्हापुरात शाहूप्रेमी जनतेकडून तसेच सोशल मीडियात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी होत असताना त्यांनी एक शब्द चुकलो असे सांगतानाच मी अपमान केला नाही, असा दावा केला आहे. हा दावा करताना पुन्हा एकदा शाहू महाराजांना उद्देशून प्रश्न विचारले आहेत. 

बोलताना एक शब्द चुकला

संजय मंडलिक वाद पेटल्यानंतर म्हणाले की, मी बोलताना एक शब्द चुकला. आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, असं मला म्हणायचं होतं. शाहू महाराज यांनी दत्तक विधान झालं आहे की नाही हे त्यांनी सांगावं, दत्तक विधान कसं झालं हे देखील सांगावं? त्यामुळे मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, असा दावा संजय मंडलिक यांनी केला. 
 

संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, आमचं ठरलंय याचं ओझं डोक्यावर खूप होतं. मंडलिक नेहमी केलेल्या मदतीची उतराई करतात. मात्र, आम्ही कधी मदत केली, तर त्यांना कधी मदत वाटली नाही. नवीन मित्र धनंजय महाडिक झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या पोटात दुखू लागलं. आमदार-खासदार म्हणजे त्यांना अजिंक्यतारावर नोकर वाटतात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला मी 12 वा खासदार होतो, पण त्यावेळी सोबत गेलेले आमदार जास्त लाडके होते. एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले, गरिबासारखे शेकडो निधी काय मागता? एकनाथ शिंदे म्हणाले हजारो कोटी देतो.


सतेज पाटलांचा हल्लाबोल 

शाहू महाराजांवर वैयक्तिक टीका केल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. सुरुवात त्यांनी केली असून शेवट आम्ही करु, असा इशारा त्यांनी मंडलिकांना दिला. छत्रपती घराण्याचा अपमान करणाऱ्या मंडलिकांनी माफी मागावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा, अशीही मागणी पाटील यांनी केली आहे. 
 


अपमान केला चुकलो, पण ; संजय मंडलिक तोल सुटलेल्या वक्तव्यावर ठाम