बातम्या
पीएम पीक विमा’ योजनेअंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षण कवच
By neeta - 1/2/2024 1:16:17 PM
Share This News:
मुंबई : ‘पीएम किसान सन्मान’ योजनेंतर्गत दरवर्षी ११.८ कोटी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते. ज्यात अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. ‘पीएम पीक विमा’ योजनेअंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.१ फेब्रुवारी ) दिली.
अर्थमंत्री यांनी आज सकाळी ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आणि नवीन संसदेतील पहिला अर्थसंकल्प आहे. निवडणुकीच्या वर्षात हा अर्थसंकल्प कसा ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली जाऊ शकते, असे मानले जात होते. मात्र, त्यामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत महिलांसाठी स्वतंत्र निधी देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
पीएम पीक विमा’ योजनेअंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षण कवच
|