बातम्या
भारतीय लोकशाही आणि समकालीन परिस्थिती या विषयावर शहाजी महाविद्यालयात मंगळवारी अंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र
By nisha patil - 3/1/2025 11:06:22 PM
Share This News:
भारतीय लोकशाही आणि समकालीन परिस्थिती या विषयावर शहाजी महाविद्यालयात मंगळवारी अंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर:दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी अंतर्विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.भारतीय लोकशाही आणि समकालीन परिस्थिती या विषयावर हे राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक आणि शिवाजी विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे माजी प्रमुख डॉ.भालबा विभुते यांच्या हस्ते होणार आहे.दिल्ली येथील प्रसिद्ध साहित्यकार, समीक्षक व व्यंगयात्रा राष्ट्रीय पत्रिकेचे संपादक श्री प्रेमजनमेजय यांचे बीज भाषण होणार आहे.
प्रमुख व्याख्याते म्हणून चर्चित साहित्यकार व शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण यांचे व्याख्यान होणार आहे. चर्चासत्राचे आमंत्रित व्याख्याते म्हणून प्रसिद्ध लेखक आणि राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर विजयकुमार पाटील हे व्याख्यान देणार आहेत. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग विजयराव बोंद्रे हे भूषवणार आहेत.
या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी देशभरातील शंभरहून अधिक संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित राहून शोधनिबंध सादर करणार आहेत. सर्वांनी या राष्ट्रीय चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. के. शानेदिवाण व राष्ट्रीय चर्चासत्राच्या समन्वयक प्रोफेसर डॉ. सरोज पाटील यांनी केले आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी आसाम, कर्नाटक, महाराष्ट्रासह नेपाळहून शोध निबंध संशोधकांनी पाठवलेले आहेत.या शोध निबंध पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.
भारतीय लोकशाही आणि समकालीन परिस्थिती या विषयावर शहाजी महाविद्यालयात मंगळवारी अंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र
|