बातम्या

आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस : चला कोल्हापूर जिल्हा बाल कामगार मुक्त करुया

International Day Against Child Labour


By nisha patil - 11/6/2024 8:20:28 PM
Share This News:



 12 जून आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये कोणत्याही आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निर्दशनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि घोडके यांनी केले आहे.

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने, नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास त्यांना 20 ते 50 हजार रुपये पर्यंत दंड वा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त, 579, ई, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 0231-2653714 वर संपर्क साधावा.


आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस : चला कोल्हापूर जिल्हा बाल कामगार मुक्त करुया