विशेष बातम्या

आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनी.. बाल स्केटिंग पटुची स्केटिंग रॅली

International Olympic Day Childrens Skating Patuchi Skating Rally


By nisha patil - 6/24/2023 4:48:32 PM
Share This News:



ॲम्युचर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दीनाच्या निमित्ताने भवानी मंडपातील ऐतिहासिक क्रीडा स्तंभापासून क्रीडा ज्योत काढण्यात आली..

 या ज्योतीची सुरुवात ॲड.धनंजय पठाडे यांच्या हस्ते करण्यात आली.. शहरातील प्रमुख  मार्गाने फिरून ही क्रीडा ज्योत शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आणण्यात आली.  त्या ठिकाणी बाल स्केटिंग पटूनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  तीन ते वीस वर्षाच्या 45 मुला- मुलींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता..

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम(राज्य स्केटिंग संघटना उपाध्यक्ष ) संदीप पवार, तेजस्विनी कदम, कृष्णा पाटील, ॲड.धनश्री कदम, भास्कर कदम, धनंजय पोलादे यांनी केले..
 


आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनी.. बाल स्केटिंग पटुची स्केटिंग रॅली