बातम्या
डी वाय पाटील हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिन उत्साहात
By nisha patil - 8/3/2024 6:27:02 PM
Share This News:
डी वाय पाटील हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिन उत्साहात
-सौ शांतादेवी डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आणि जेंडर इक्वलिटी अँड वुमन डेव्हलपमेंट सेल यांच्या वतीने डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा झाला. सौ शांतादेवी डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'इन्स्पायर इंक्लुजन' या विद्यार्थिनी v महिला कर्मचऱ्यांनी फॅशन शो , नृत्य, फ्लॅश मोब सादर केले.
यानिमित्त वुमन डेव्हलपमेंट सेल चा लोगो डिझाईन स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनीं उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात पहिल्या तीन क्रमांकाना बक्षीस देण्यात आले. जेंडर इक्वलिटी (लैंगिक समानता) या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. तसेच शिक्षकेतर कर्मचारी, महिला सफाई कर्मचारी, महिला सुरक्षा रक्षक यांच्यासाठी उखाणा स्पर्धा आयोजित केली होती.
या कार्यक्रमासाठी 300 हून अधिक महिला उपस्थित होत्या. डी. वाय पाटील ग्रुपच्या मार्गदर्शक सौ. शांतादेवी डी पाटील व अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. निवेदिता पाटील यांनी केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील,कुलसचिव डॉ व्ही व्ही भोसले, डीन डॉ. आर के शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डी वाय पाटील हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिन उत्साहात
|