बातम्या

प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

International Yoga Day celebrated with enthusiasm in Private High School


By nisha patil - 6/21/2023 5:13:17 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित प्रायव्हेट हायस्कूल व जूनियर.कॉलेज, कोल्हापूरमध्ये "आंतरराष्ट्रीय योगदिन "प्रशालेच्या रंगमंचावर उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योगदिन व भारतीय प्राचिन योग वारसा यावरती मुख्याध्यापिका सौ. व्ही एल डेळेकर . यांनी विद्यार्थ्यांचे उदबोधन केले. त्यांनी योग ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी असून योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगभर सुरु आहे असे सांगितले.

यावेळी योग शिक्षक . बी.एस.जाधव, यांनी विविध योग प्रकाराची माहिती सांगत विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके करवून घेतली. विद्यार्थिनी कु.केतकी हिरेमठ हिने योग साधने संदर्भातील श्लोक पठण केले.एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी साडेसहा वाजता प्रशालेत उपस्थित राहून योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. या विद्यार्थ्यांना एनसीसी प्रमुख . डी. एम. रेडेकर व श्रीम. एस. एस. माने. यांनी विशेष मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे एनसीसीच्या मुलींनी शहरांमध्ये योग साधनेचे प्रबोधन करण्यासाठी रॅलीमध्ये सहभाग घेतला.

या प्रसंगी शाळेचे प्राचार्य  व्ही एल डे ळेकर, उपमुख्याध्यापक . जी. एस. जांभळीकर, पर्यवेक्षक  पी एम जोशी, जिमखाना प्रमुख .एस. आर. गानबावले.क्रीडा शिक्षक डी. बी.पाटील., विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा