बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

International Yoga Day celebrated with enthusiasm in Vivekananda College


By nisha patil - 6/21/2024 6:37:35 PM
Share This News:



कोल्हापूर दि.21 : एकविसावे शतकात  भारतीय संस्कृती आणि विचार जगास दिशा देणारे आहे . योग आणि धारणा याद्वारे दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी करून आपणास इच्छित असणारे ध्येय साध्य करता येते . योगामुळे  आपणास सुदृढ शरीरासोबत परिपक्व मनाची निर्मिती करता येते. असे मत प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी मांडले.

21 जून 2024  रोजी महिला सक्षमीकरणासाठी योग हा कार्यक्रम योग गुरु श्री विलास गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. श्री गोखले यांनी योग, यम, नियम धारणा, प्रत्याहार याचे विवेचन निरनिराळ्या योग आसनांच्याद्वारे केले.  याप्रसंगी सौ गीता पाटील योग शिक्षिका यांनी कृती आधारित योगासने विद्यार्थ्यांच्या कडून करवून घेतली . यावेळी 6 महाराष्ट्र एनसीसी गर्ल्स् बटालियनचे कर्नल संधान मिश्रा, 5 महाराष्ट्र एनसीसी चे  मानस दीक्षीत,  सुहास काळे  यांनी मार्गदर्शन केले.

सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन कॅप्टन सुनिता भोसले व एन.एस.एस.प्रमुख प्रा संदीप पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रा डॉ  राजश्री पाटील,   प्रा  यु.आर.हिरकुडे,  प्रा एल.एस.नाकाडी, प्रा.रविराज सुतार उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले तर आभार प्रा बागडी यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमासाठी एनसीसी चे कॅडेट्स आणि एन. एस. एस.चे स्वयंसेवक उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वी संपन्नतेसाठी आय.क्यु.ए.सी.समन्वयक डॉ.श्रुती जोशी, रजिस्टार  रघुनाथ जोग यांचे सहकार्य लाभले  यावेळी ज्युनियर सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, एनसीसी विभागातील छात्र,  एन.एस.एस. विभागातील स्वयंसेवक आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी  उपस्थित होते .


विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा