बातम्या

वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ११ तारखेला कोल्हापुरात

Interviews of interested candidates of Vanchit Bahujan Aghadi on 11th in Kolhapur


By nisha patil - 10/10/2024 2:38:13 PM
Share This News:



प्रतिनिधी: विनोद शिंगे, कुंभोज वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे आणि विधानसभा निवडणूक समन्वय समितीचे सदस्य, तसेच राज्य कार्यकारिणीच्या सदस्य डॉ. क्रांतीताई सावंत हे विधानसभा निवडणूकांच्या तयारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी, दुपारी २ वाजता सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद कदम, जिल्हाध्यक्ष (कोल्हापूर उत्तर) यांनी केले आहे.

सदर मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड आणि त्यांच्या भूमिका ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या सामाजिक आणि राजकीय उद्दिष्टांसाठी सक्षम उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.

या मुलाखतीमध्ये उमेदवारांचे विचार, योजना आणि त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून असणारा दृष्टिकोन तपासला जाणार आहे.


वंचिवंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमुलाखती ११ तारखेला कोल्हापुरातत बहुजन आघाडीच्या इच्छुक वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ११ तारखेला कोल्हापुरातमुलाखती ११ तारखेला कोल्हापुरात