बातम्या

उमेदवारांची धाकधूक वाढली ; लवकरच होणार चित्र स्पष्ट

Intimidation of the candidates increased The picture will be clear soon


By nisha patil - 4/6/2024 11:43:38 AM
Share This News:



आज महाराष्ट्रासह देशातील लोकसभेचा निकाल समोर येणार आहे. अवघ्या काही मिनीटांमध्ये म्हणजेच ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे.अवघ्या देशांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा आज परिणाम दिसून येणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दोन मातब्बर उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असून आज नेमकी बाजी कोण जिंकणार याचे चित्र देखील स्पष्ट होणार आहे. तर अवघ्या काही वेळातच या निकालाच्या फेऱ्या होतील आणि कोल्हापूरच्या मतदारांनी दिलेला कौल नेमका कोणाला हे स्पष्ट होईल


उमेदवारांची धाकधूक वाढली ; लवकरच होणार चित्र स्पष्ट