बातम्या

विवेकानंद मध्ये नवनियुक्त्‍ शिक्षकांचे उदबोधन

Invocation of newly appointed teachers in Vivekananda


By nisha patil - 7/16/2024 9:08:00 PM
Share This News:



 येथील विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नवनियुक्त्‍ शिक्षकांचे उदबोधन घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनि.सायन्स्‍ विभाग प्रमुख प्रा एम ए कुरणे यांनी केले.

शाळा सिध्दी प्रमुख प्रा. गीतांजली साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी  डॉ.बापूजी साळुंखे यांचा जीवनप्रवास व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी केलेले कार्य याबद्दल व्याख्यान दिले.  तसेच बापूजींच्या खडतर प्रवासात संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांची लाभलेली मोलाची साथ यावरही मनोगत व्यक्त केले. आभार स्टाफ सेक्रेटरी श्री. के. जे. गुजर यांनी मानले.  या कार्यक्रमाचे नियोजन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  याप्रसंगी  ज्युनिअर सायन्स्‍ विभागातील प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.


विवेकानंद मध्ये नवनियुक्त्‍ शिक्षकांचे उदबोधन