बातम्या

महाविकास आघाडीचा युतीधर्म शिवसेनेसाठीच आहे का ? : रविकिरण इंगवले

Is Mahavikas Aghadi's alliance only for Shiv Sena


By nisha patil - 10/7/2023 5:09:51 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवीकरण इंगवले यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीचा युतीधर्म हा शिवसेना पुरताच मर्यादित आहे का ? असा सवाल करत मंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीतून बाजूला होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर भाजप शिवसेना युतीमध्ये मंत्रीपद स्वीकारलं, मात्र महाविकास आघाडीचे घटक असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्यांचं स्वागत करणं हे योग्य आहे का? जर त्या ठिकाणी शिवसैनिक असता तर त्याच्यावरती ताबडतोब कारवाई झाली असती असेही  रविकरण इंगवले यांनी यावेळी सांगितलं. 


महाविकास आघाडीचा युतीधर्म शिवसेनेसाठीच आहे का ? : रविकिरण इंगवले