बातम्या

उन्हाळ्यात दही की ताक पिणे अधिक फायदेशीर असते? जाणून घ्या...

Is drinking curd or buttermilk more beneficial in summer Find out


By nisha patil - 3/6/2023 7:43:09 AM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम:यंदा उन्हाची तीव्रता खूप जास्त आहे. कडाक्याच्या उन्हामुळे  नागरिक घामाघून होत आहेच. तसेच अनेकांना त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचा रस पितात आणि काही घरगुती उपाय करून बघतात. तर काही लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी उसाचा रस, पन्ह, ताक, दही यांसारख्या पदार्थांचे सेवन करतात.

उन्हाळ्यात ताक आणि दही या दोन्ही पदार्थांचे सर्वात जास्त सेवन केले जाते. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. दूधापासून तयार करण्यात येणाऱ्या या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक समाविष्ट असतात. मात्र असे असले तरी उन्हाळ्यात दही खाण्याऐवजी ताक पिणे योग्य असते असे म्हटले जाते. 

उन्हाळ्यात दही खायचा की नाही?

दही हा उष्ण गुणधर्म असणारा पदार्थ आहे. उन्हाळ्यात गरम दही खाल्ल्याने पोटाला त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार दही पचण्यास कठीण असते. त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. काही वेळा दही खाल्ल्याने पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी बद्धकोष्ठतेची त्रास सुरू होऊ शकते. दह्यामध्ये उष्णतेमुळे पित्तदोष किंवा रक्तस्रावाचा त्रास होऊ शकतो. याउलट ताक पचायला हलका होता. याच्या वापराने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय ताक थंड देखील असते.

ताक पिण्याचे फायदे

शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते: हे प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच डॉक्टर सुद्धा ताकाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. विशेषत: उन्हाळ्यात त्यातून पाण्याची कमतरता भरून काढते.

हाडे मजबूत होतात : ताकामध्ये पुरेसे कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजारापासून दूर राहू शकता.

पचनक्रिया सुरळीत होते : ताक प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. यात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. या प्रोबायोटिक्समुळे ते शरीरातील आतड्यांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते

शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाचे विकार होतात. जर तुम्ही नियमितपणे खाल्ले तरच तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. एक ग्लास टाक नियमितपणे पिणे निरोगी हृदयासाठी फायदेशीर ठरेल.


उन्हाळ्यात दही की ताक पिणे अधिक फायदेशीर असते? जाणून घ्या...