बातम्या
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता आहे की नाही...? यावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतला?
By nisha patil - 10/17/2023 7:17:10 PM
Share This News:
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता आहे की नाही...? यावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतला?
समलैंगिक विवाह या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी
समलैंगिक विवाहांना मान्यता देणं हा संसदेचा अधिकार
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.
समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल दिला आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, समलिंगी विवाह बाबतीत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. पाच न्यायधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणात निकाल दिला असून, हा निकाल पाच टप्प्यात विभागलेला होता. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं म्हटलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्राला समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती समलैंगिक समुदायाचे अधिकार, हक्क आणि प्रश्नांसंदर्भात विचार करेल.
11 मे रोजी न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण केली.होती . याचिकाकर्त्यांनी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, असा आग्रह धरला होता. तर केंद्र सरकारने समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं होतं. त्यानंतर आज न्यायालयाने यावर निकाल देत समलिंगींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणं फेटाळलं आहे.
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता आहे की नाही...? यावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतला?
|