विशेष बातम्या
जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य असते का ?
By nisha patil - 4/8/2023 7:37:09 AM
Share This News:
पाणी पिणं आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य असते का ?
हे योग्य आहे की नाही तेच जाणून घेऊया. तुम्ही काय खाल्लं आहे, त्यावर हे योग्य की अयोग्य, ते अवलंबून असतं. फळ व भाज्यांबद्दल सांगायच तर ते खाल्ल्यावर पाणी पिणं फायदेशीर ठरू शकत. फल व भाज्यांमध्ये फायबर जास्त असते, जे आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात.
भरपूर पाणी प्यायल्याने आपल्या पचनसंस्थेद्वारे संपूर्ण शरीरात फायबरची हालचाल होण्यास मदत होते. त्यामुळे जे अन्न खातो त्यातील पोषक तत्वं आपल्या शरीराला मिळतील हे निश्चित होते. पण पेरू, केळं, सफरचंद अशी काही फळ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये.
स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका
तर ब्रेड, पास्ता आणि बटाटे यांसारखे स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. जेवताना खूप पाणी पिणे हेही अपचनसाठी कारणीभूत ठरू शकते. जे आरोग्यासाठी चांगले नसते.
जड व तिखट पदार्थ खाल्ल्यावर लगेच गार पाणी पिणे टाळा
जेवल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेवरही घातक परिणाम होतात. थंड पाण्याने पचनसंस्थेला धक्का बसू शकतो. त्यामुळे पचन प्रक्रिया मंद होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या शरीराला अन्नातून पोषक तत्वांचं पचन करणं कठीण होऊ शकत. त्यामुळे गार पाणी प्यायचं असेल तर ते जेवणानंतर अर्ध्या तासाने प्यावे.
जड पदार्थ खाल्ल्यावर हर्बल टी प्यावा
चांगले पचन व्हावे व हायड्रेटेडही रहावे, यासाठी उपाय शोधत असाल तर जेवणानंतर हर्बल टीचे सेवन करावे. आलं, पुदीना, व कॅमोमाईल सारख्या पदार्आथंनी बनलेला चहा पचनास मदत करतो आणि सूज कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तुम्ही कितीही जड आणि मसालेदार पदार्थ खाल्लेत तरी, त्यानंतर गरमागरम हर्बल चहा प्यायला तर ते तुमचे शरीर आणि मन शांत राहते. तसेच यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरालाही विश्रांती मिळते.
जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य असते का ?
|