बातम्या

जॉगिंग, एक्सरसाइज किंवा सायकलिंग जास्त फायदेशीर काय?

Is jogging exercise or cycling more beneficial


By nisha patil - 6/2/2024 2:49:30 PM
Share This News:



आाजकाल सायकल चालवणं, एक्सरसाइज करणं किंवा पायी चालणं फारच वाढलं आहे. हृदय चांगलं ठेवण्यासाठी, वजन कंट्रोल करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत.

जेव्हा गुडघ्यांच्या समस्येबाबत विषय निघतो तेव्हा लोकांना समजत नाही की, कोणता वर्कआउट गुडघ्यांसाठी चांगला ठरू शकतो. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातील एकाची निवड करणं परिस्थिती आणि प्राथमिकतेवर अवलंबून असतं. आज आम्ही सांगणार आहोत की, चांगल्या आरोग्यासाठी सायकल चालवणं जास्त चांगलं की एक्सरसाइज चांगली की पायी चालणं.

सायकल चालवणं

जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुमचे पाय पॅडलच्या संपर्कात राहतात, यावेळी जी क्रिया होते तेव्हा गुडघ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, सायकल चालवल्याने तुमच्या गुडघ्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते.

क्लिनिकल रिहॅबिलिटेशनमध्ये प्रकाशित 2021 च्या एका रिपोर्टनुसार, सायकल चालवल्याने गुडघ्यांची जुनी ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या दूर होऊ शकते आणि गुडघ्यांचं कामही सुधारतं.

पायी चालणं

पायी चालणं हा व्यायामाचा एक नैसर्गिक आणि सोपा प्रकार आहे. ज्यामुळे गुडघ्याचं आरोग्य सुधारतं. याने जॉइंटमधील लवचिकपणा कायम राहण्यास मदत मिळते. गुडघ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी मजबूत होतात आणि वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते. पायी चालल्याने गुडघ्याच्या जॉइंटमध्ये चांगलं सर्कुलेशन होतं आणि लवचिकता वाढते. तसेच पायी चालल्याने हाडांचं आरोग्यही चांगलं राहतं.

सायकल चालवणं, एक्सरसाइज जास्त फायदेशीर की पायी चालणं?

गुडघे मजबूत करण्यासाठी किंवा एकंदर शरीर चांगलं ठेवण्यासाठी सायकल चालवणं किंवा पायी चालणं दोन्हीही फायदेशीर असतं. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना असेल तर पायी चालणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुमचे गुडघे निरोगी आणि फिट आहेत तर सायकल चालवणंही फायदेशीर ठरू शकतं. नियमितपणे व्यायाम करणं गुडघ्यांच्या मजबुतीसाठी महत्वाचं आहे.


जॉगिंग, एक्सरसाइज किंवा सायकलिंग जास्त फायदेशीर काय?