बातम्या

केस गळताय का? केसांच्या चांगल्या वाढीसाठी आहारात करा या 4 गोष्टींचा समावेश

Is your hair falling out


By nisha patil - 12/12/2023 7:35:19 AM
Share This News:



धावपळीच्या जीवनात शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांवर परिणाम होतो. ज्यामुळे केस गळतीची समस्या सुरु होते. केसाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतात.

केस वाढवण्यासाठी आपण अनेक पद्धती वापरतो. पण त्यांचा फायदा इतका होत नाही. केसांच्या वाढीसाठी काही पदार्थ आहारात समावेश केला तर फायदा होऊ शकतो. तुम्ही देखील केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही खालील गोष्टींचा आहारात समावेश करु शकता.

अंडी

केस वाढण्यासाठी प्रथिने सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत अंडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. अंड्यात चांगले प्रथिने आढवळतात. नाश्त्याला तुम्ही अंडी खाऊ शकतात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या अनेक आराजांमध्ये फायद्याच्या ठरतात. केस कमकुवत झाले असेल तर त्यासाठी ही हिरव्या भाज्या फायदेशीर ठरु शकता. पालक तुम्ही तुमच्या आहारात समावेश करु शकता. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळतो. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे देखील केस गळतीची समस्या होऊ शकते.

व्हिटीमिन सी

केस मजबूत हवे असतील तर व्हिटिमिन सी महत्त्वाची भूमिका बजावतेय. व्हिटामिन सी साठी तुम्ही आहारात आवळा, संत्री, लिंबू यांच्या समावेश करु शकता. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते.

गाजर

केस चांगले वाढवायचे असतीर तर मग गाजर खालले पाहिजे. तुम्ही गाजराचा रस पिऊ शकतात. गाजरामध्ये व्हिटामिन ए भरपूर असते. जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. सलाड म्हणून देखील तुम्ही गाजरचे सेवन करु शकता.


केस गळताय का? केसांच्या चांगल्या वाढीसाठी आहारात करा या 4 गोष्टींचा समावेश