बातम्या
ईशान-हार्दिकची खेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 267 धावांचं आव्हान
By nisha patil - 3/9/2023 10:08:07 AM
Share This News:
ईशान-हार्दिकची खेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 267 धावांचं आव्हान
टीम इंडियाच्या हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या जोडीने केलेल्या भागीदारीने लाज राखली. या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने पाकिस्तानला 267 धावांचं आव्हान दिलंय.उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि विकेटकीपर ईशान किशन या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कपमधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 48.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 266 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाचे गोलंदाज पाकिस्तानला या धावा करण्यापासून रोखणार का, याकडे भारतीय समर्थकांचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.हार्दिक-ईशानची शतकी भागीदारी
आता टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज होती. टीम इंडियाला बॅकफुटवरुन बाहेर काढण्याची जबाबदारी ही उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच खेळणाऱ्या ईशान किशन या दोघांनी घेतली. या दोघांनी सावकाश सुरुवात करत गिअर बदलत टीमला चांगल्या स्थितीत आणलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली.
हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या दोघांनी अर्धशतकं ठोकली. दोघांनाही शतकाची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. हरीस रौफ याने ही जोडी फोडली. ईशान 82 धावांवर आऊट झाला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 142 बॉलमध्ये 138 धावांची निर्णायक पार्टनरशीप केली. ईशान आऊट झाल्यानंतर हार्दिकने गिअर बदलला आणि फटेक मारायला सुरुवात केली. मात्र हार्दिकही शतकापासून चुकला. हार्दिकने 90 बॉलमध्ये 87 धावा केल्या.
टीम इंडिया 50 ओव्हर खेळण्यात अपयशीत्यानंतर ऑलराउंडर असलेल्या रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर या दोघांनी निराशा केली. जडेजा 14 आणि ठाकुर 3 धावा करुन माघारी परतले. कुलदीप यादव याने 4 धावा केल्या. तर 13 महिन्यांनी वनडेत कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराह याने निर्णायक 16 धावांची खेळी केली. तर मोहम्मद सिराज 1 धावेवर नाबाद परतला.
पाकिस्तानची पेसरची धमाल
दरम्यान पाकिस्तानच्या पेसर्स अर्थात वेगवान गोलंदाजांनीच सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या. शाहीन अफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नसीम शाह आणि हरीस रऊफ या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 3-3 विकेट्स गेल्या.
ईशान-हार्दिकची खेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 267 धावांचं आव्हान
|