बातम्या
'मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झालीये'; नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
By nisha patil - 5/30/2023 4:31:31 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम अभिनेते नसिरुद्दीन शाह हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांची ताज ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमध्ये त्यांनी अकबर ही भूमिका साकारली. या वेब सीरिजमधील नसिरुद्दीन यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. नसिरुद्दीन शाह हे त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजमुळे चर्चेत असतात. पण सध्या नसिरुद्दीन शाह हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन शाह यांनी सांगितले की, 'मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे.' त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. या मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन शाह यांनी निवडणूक आयोगबाबत देखील वक्तव्य केलं आहे.
नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, "काही चित्रपट आणि शो यांचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. यासोबतच चित्रपट आणि शो यांचा वापर निवडणुकीत मते मिळविण्यासाठीही केला जात आहे. सत्ताधारी पक्ष अतिशय चतुराईने त्यांचा वापर करत आहे, त्यामुळेच आजकाल शिकलेल्या लोकांमध्ये देखील मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे."
पुढे नसिरुद्दीन शाह यांनी सांगितलं, "निवडणूक आयोगही अशा गोष्टींवर मौन बाळगतो. राजकीय पक्ष निवडणुकीसाठी धर्माचा वापर करतात तेव्हा निवडणूक आयोग गप्प बसतो. दुसरीकडे, अल्ला हू अकबर, म्हणत कोणत्याही मुस्लिम नेत्याने मते मागितली असती तर आतापर्यंत मोठा गदारोळ झाला असता."
नसिरुद्दीन शाह हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, 'मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते' त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले होते.
'मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झालीये'; नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
|