बातम्या

बहुजन समाजातील मुले उच्चशिक्षित होत आहेत हे अभिमानास्पद -राजे समरजितसिंह घाटगे

It is a matter of pride that the children of the Bahujan community are getting higher education


By nisha patil - 5/17/2024 4:35:59 PM
Share This News:



कागल,प्रतिनिधी.nराजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये बहूजन समाजातील मुलांनी उच्चशिक्षित व्हावीत.यासाठी  प्रोत्साहन दिले होते.कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना शेतकरी कुटूंबातील धनश्री पाटीलने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी यशस्वीपणे पुर्ण करुन त्यांचे स्वप्न साकारले.हे अभिमानास्पद आहे.असे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष व छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.

करनूर (ता.कागल)येथील बाळासो पाटील या शेतकऱ्याच्या धनश्री या कन्येने एमबीबीएस पदवी यशस्वीपणे पुर्ण केल्याबद्दल तिच्या सत्कारवेळी ते बोलत होते. 

घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. विक्रमसिंहराजे  घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या सभासदांच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू केली. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.कारखान्याचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत.

यावेळी बाळासो पाटील,आनंदा पाटील,दिलीप पाटील,विलास पाटील,सुनिल गुदले,कुमार पाटील,जयसिंग घाटगे,विजय चौगुले आदी उपस्थित होते.


बहुजन समाजातील मुले उच्चशिक्षित होत आहेत हे अभिमानास्पद -राजे समरजितसिंह घाटगे