बातम्या
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे उद्देश समजून घेणे महत्वाचे - डॉ .सुहास सपाटे, प्राचार्य, BSIET, कोल्हापूर
By nisha patil - 8/23/2024 3:10:56 PM
Share This News:
नवीन शिक्षण धोरण 2020 च्या धर्तीवर अभ्यासक्रमांमध्ये बरेच बदल होत आहेत. हे धोरण विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर अधिक भर देणारे आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांनी आपण शिकत असलेल्या अभ्यासक्रमांमधील कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असून त्यांचे उद्देश सुरुवातीलाच जर समजून घेतले तर पुढे विद्यार्थ्यांची वाटचाल सुखकर होईल. असे विचार प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, (डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी (BSIET) यांनी मांडले. ते विवेकानंद कॉलेजमधे एम.एस्सी.भाग 1 च्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकांनद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.आर.आर. कुंभार यांनी एम.एस्सी. स्टॅटिस्टिक्स व ॲप्लाईड स्टॅटिस्टिक्स मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागचा हेतू व तो कशा पध्दतीने राबविला जातो हे स्पष्ट केले. याप्रसंगी प्रा.अतिश तानगावडे यांची एम.पी.एस.सी. व्दारे जिल्हा सांख्यिकी अधिकारीपदी निवड झालेबद्दल व प्रा.आशियाना मकानदार यांची एमएच-सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा.सौ वर्षा शिंदे यांनी केले. आभार कु. प्रज्ञा कुंभार यांनी मानले तर सुत्रसंचालक निरुपमा देसाई, सायली शिराळे, दर्शन कणिरे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे उद्देश समजून घेणे महत्वाचे - डॉ .सुहास सपाटे, प्राचार्य, BSIET, कोल्हापूर
|