बातम्या
प्रजासत्ताक दिनाचे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणे गरजेचे -डॉ. नामदेव मोळे
By nisha patil - 1/26/2024 7:13:17 PM
Share This News:
पन्हाळा - प्रजासत्ताक दिन हा आपण एक उत्सव म्हणून साजरा करतो या दिनाचे महत्त्व जाणून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे लेखन कार्य होणे गरजेचे आहे यातूनच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो त्यामुळे महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे विविध उपक्रम घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ.नामदेव मोळे यांनी केले.
श्रीपतराव चौगुले महाविद्यालय माळवाडी - कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व भित्तीपत्रक समिती मार्फत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेख व कवितांच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.नामदेव मोळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार एम.एस.चौगुले होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील, संस्था संचालक डॉ.अजय चौगुले, डॉ.विजयकुमार पाटील,आय.क्यु.ए .सी.समन्वयक डॉ.बी.एन.रावण ऍक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस. कुरलीकर,ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ.उषा पवार, सी.डी.सी.सदस्य सागर वरपे होते.
कार्यक्रमास सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सायली तांबवेकर हिने केले तर आभार समिती प्रमुख श्रीमती एस.
जी.कांबळे यांनी मानले.
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये भित्तीपत्रक प्रकाशन प्रसंगी डॉ.नामदेव मोळे,एम.एस.
चौगुले,शिवाजीराव पाटील, डॉ.अजय चौगुले,डॉ.विजयकुमार
पाटील,डॉ.बी.एन.रावण,डॉ.उषा पवार,डॉ.एस.एस.कुरलीकर,सागर वरपे,प्रा.एस.जी.कांबळे व मान्यवर
प्रजासत्ताक दिनाचे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणे गरजेचे -डॉ. नामदेव मोळे
|