बातम्या

शरद पवार यांना आता पक्ष चालवणं शक्य नाही- देवेंद्र फडणवीस

It is not possible for Sharad Pawar to run the party now  Devendra Fadnavis


By nisha patil - 8/5/2024 5:45:00 PM
Share This News:



बारामती हातून निसटून जाण्याची भीती शरद पवारांना आहे. त्यामुळे त्यांनी विलिनीकरणाची भाषा केली आहे, तसंच काँग्रेसनेही यापूर्वी अनेकदा हा प्रस्ताव दिलाय. मात्र यात तिढा होता तो म्हणजे सुप्रिया सुळेंचा ..प्रदेश काँग्रेसची धुरा ही सुप्रिया सुळेंकडे द्यावी. पण काँग्रेसने हा प्रस्ताव झिडकारुन लावला. काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय पवारांकडे पर्याय नाही. कारण त्यांच्या मुलीकडे असलेले राजकीय कौशल्य बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी अपुरे आहे.प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या  भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले, असं फडणवीस म्हणाले. 
 

शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन काँग्रेसमध्ये करतील.


शरद पवार यांना आता पक्ष चालवणं शक्य नाही- देवेंद्र फडणवीस