बातम्या
शासकीय योजनेचा लाभार्थी डाटा प्रचारासाठी वापरणे हे चुकीचे - गृहराज्यमंत्री सतेज पाटील
By neeta - 2/3/2024 5:30:13 PM
Share This News:
कोल्हापूर,२ मार्च : पी एम किसान संदर्भात डाटा लिक होत आहे. हा डाटा लीक कसा झाला? यांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी ? अशी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांची निवडणुक आयोगाला मागणी केली आहे. कदमवाडी येथे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डीपीयू मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऑर्गन ट्रान्सप्लांट ओपीडीच्या उद्धाटन सोहळा गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते
सतेज पाटील म्हणाले, काल सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये पी एम किसान योजनेसंदर्भात तुम्हाला २ हजार मिळाले का? अशा पद्धतीची विचारणा करण्यात आली आहे. उज्वला गॅस मधल्या काही लोकांना फोन आलेले असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाने लक्ष घालने गरजेचे आहे. हा डाटा लीक कसा झाला? कॉल सेंटर मधून कुणासाठी फोन येतोय? हा डाटा कोणत्या पक्षाने घेतल्या आहे का? यांची चौकशी होणे गरजेचे आहे निवडणूक आयोगाने याबदल चौकशी केली पाहिजे. हा डाटा कशा पद्धतीने लीक झाला? या पद्धतीचे फोन जाणे हे संयुक्तिक नाही . शासकीय योजना मधला लाभार्थी चा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणे हे चुकीच आहे याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी. असेही ते यावेळी म्हणाले.
शासकीय योजनेचा लाभार्थी डाटा प्रचारासाठी वापरणे हे चुकीचे - गृहराज्यमंत्री सतेज पाटील
|